Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'देवाला पत्र' अलका जाजू यांना प्रथम बक्षिसाचा आशीर्वाद!

'देवाला पत्र' अलका जाजू यांना प्रथम बक्षिसाचा आशीर्वाद!

वर्धा

Handwritten letters मोबाईलच्या युगात हरवत चाललेल्या हस्तलिखित पत्रांच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याचा स्तुत्य उपक्रम नागपूरच्या ज्योती माहेश्वरी महिला मंडळाने राबविला. 'एक पत्र भगवान के नाम' या राष्ट्रीय स्तरावरील अनोख्या पत्रलेखन स्पर्धेत वर्धेच्या अलका राजकुमार जाजू यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

handwritten letters पन्नास वर्षांवरील महिला-पुरुषांसाठी खुल्या असलेल्या या निबंध स्पर्धेसाठी निबंध स्वहस्ताक्षरात असावे अशी महत्त्वपूर्ण अट टाकण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाच्या गदारोळात हरवत चाललेल्या आत्मीय संवादाला पुन्हा उजाळा देण्याचा या स्पर्धेमागील उद्देश होता. अलका जाजू यांनी देवाला लिहिलेल्या समाजातील अनेक समस्यांंविषयी थेट देवालाच प्रश्न विचारले आहेत. विवाह समस्येला केंद्रबिंदू ठेवले.

handwritten letters पत्रातून जीवनातील गुंतागुंत, ईश्वराविषयीची कृतज्ञता, अंतर्मनातील प्रार्थना आणि भविष्याची स्वप्ने व्यक्त केली. त्यांच्या या निबंधाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला.

अलका जाजू यांना यापूर्वीही निबंध, परिसंवाद, नाट्यलेखन, आत्मकथन अशा विविध साहित्यप्रकारांत पुरस्कार पटकवले आहेत.

handwritten letters त्यांच्या या यशाबद्दल पर्यावरण अभ्यासक किरण मुंदडा, विदर्भ प्रादेशिक महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष ज्योती बाहेती, मंडळाच्या अध्यक्ष ज्योती भूतडा, सचिव अर्पणा टावरी, माजी अध्यक्ष अर्चना बिंझानी, प्रा. डॉ. ललित राठी तसेच समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur