Dailyhunt
धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती

धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती

छत्रपती संभाजीनगर,

Sexual assault गुंगीचे औषध देऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता.

शरीरसंबंध जबरदस्तीने प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यात एका २५ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तिला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पीडितेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी बलात्काराचे गंभीर कलम आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरोपी शरद आथरे (रा. उंबरखेड, ता. निफाड) हा पीडितेच्या घरी आला होता. त्याने चहामध्ये गुंगीचे औषध देऊन पीडितेवर पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता. २४ मार्च रोजी न्यायालयात नोंदवलेल्या जबाबातही तिने संपूर्ण सत्य मांडले नव्हते. मात्र, ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून तिने दिलेल्या पुरवणी जबाबात संपूर्ण आपबीती सांगितली. आरोपीने तिच्या मासिक पाळीच्या काळातही जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचेही या वेळी उघड झाले.sexual assault आधी विनयभंगाचा गुन्हा नंतर अत्याचार या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली. सुरुवातीला दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पीडितेच्या पुरवणी जबाबानंतर बलात्कारासह इतर गंभीर कलमे वाढवण्यात आली असून, पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur