नवी दिल्ली,
जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात.
लक्षणे काय आहेत? दिल्लीच्या उजाला सिग्नस हॉस्पिटलचे संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी न्यु १८ हिंदिला दिलेल्या बातमीत सांगितले आहे की, ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड, नैराश्य, त्यांच्या आवडीच्या कामात रस नसणे, सतत डोकेदुखी, झोप नीट न येणे आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरणे अशी लक्षणे असतात. रक्त तपासणीत डॉक्टर ते शोधू शकतात. जसे की साखर किंवा थायरॉईडचे असंतुलन, मूत्रपिंडाचे (किडनी) खराब कार्य इत्यादी, किंवा कोणताही संसर्ग होणे किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता देखील ब्रेन फॉगचे कारण असू शकते.

