Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धावपट्टीवर विमानासमोर आले माकड

धावपट्टीवर विमानासमोर आले माकड

लखनौ

Plane accident लखनौच्या अमाउसी येथील चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. सुमारे 125 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवरून वेगाने जात असताना अचानक एक माकड समोर आले.

वैमानिकाने आपत्कालीन ब्रेक लावत कठीण परिस्थितीत विमान थांबवले. त्यानंतर विमान पुन्हा धावपट्टीवर परत आणण्यात आले. सुमारे एका तासानंतर विमान रायपूरसाठी रवाना झाले.

plane accident इंडिगोचे लखनौ ते रायपूर जाणारे विमान ६ ई ६५२१ गुरुवारी सकाळी उडणार होते. विमानाने धावपट्टीवर लक्षणीय वेग गाठला होता, तेव्हा वैमानिकाच्या लक्षात आले की, एक माकड समोर बसले आहे. जर त्याने आपत्कालीन ब्रेक लावले नसते तर विमानाच्या थ्रस्ट जेट्सनी त्याला आत खेचले असते. त्यामुळे इंजिनला आग लागण्याचा धोका होता. विमानाच्या पंखांशी धडक झाल्यास मोठे नुकसान होऊ शकले असते. वैमानिकाच्या प्रसंगसावधानतेमुळे मोठा अपघात टळला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur