Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धावत्या दुचाकीवर चाकू खुपसून हत्या

धावत्या दुचाकीवर चाकू खुपसून हत्या

अमरावती,

Murder-on-a-moving-two-wheeler : अमरावती ते दर्यापूर मार्गावरील धामोरी बस स्टॅण्डसमोरील मुख्य रस्त्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी चालत्या दुचाकीवरील एका तरुणाच्या पाठीत चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची घटना २९ जुलै रोजी रात्री उघडकीस आली.

या भीषण हत्येमुळे परिसरात दहशत पसरली असून, राहुल राजू रावेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याचे खोलापूरचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे यांनी सांगितले.

दर्यापूर-अमरावती मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही प्रवासी व धामोरी बस स्टॉप परिसरात असलेल्या नागरिकांनी एक तरुण पाठीत चाकू खुपसलेल्या व गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार डॉ. वाकडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह पाठीत चाकू असलेल्या अवस्थेतच आढळला. घटनास्थळी एक दुचाकी आढळली. मारेकऱ्याने या तरुणाचा पाठलाग करून पाठीत चाकू खुपसला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखाप्रमुख अशोक लांडे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून मृताची ओळख पटविली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur