नागपूर ,
Hanuman Jayanti धुंडा मारुती, वरोडा येथील मारुती मंदिराचे अलीकडेच करण्यात आलेले संपूर्ण नूतनीकरण लक्षवेधी ठरत असून, याच पार्श्वभूमीवर येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटविण्यात आले होते.
श्रद्धाळूंच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून ओळख असलेल्या या प्रसिद्ध मारुती मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. अनेकांनी आपल्या इच्छा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी पूजा अर्चा केल्या.
संस्थेच्या परंपरेनुसार हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक भक्तांनी घरून प्रसाद आणून एकमेकांमध्ये वाटला,Hanuman Jayanti ज्यामुळे भक्तीभाव आणि आपुलकीचे वातावरण अधिकच वृद्धिंगत झाले.कार्यक्रमादरम्यान भजन-कीर्तनाचा सुरेल सोहळा रंगला होता. अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
सौजन्य :डॉ. अचला तांबोळी,संपर्क मित्र

