Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिग्रस तालुक्यात डोळंबा येथे घाणीचे साम्राज्य

दिग्रस तालुक्यात डोळंबा येथे घाणीचे साम्राज्य

पाणी रस्त्यावर : नागरिक संतप्त

दिग्रस,

Dolamba Gram Panchayat तालुक्यातील डोळंबा येथे ग्रामपंचायतचे नाल्या सफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत.

अनेक महिन्यांपासून नाल्या साफ न झाल्याने कचरा, गाळ साचून पाण्याचा निचरा बंद झाला आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरले असून संपूर्ण परिसरात दुर्गंध पसरला आहे. या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले व वृद्धांना रस्त्यावरून चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे.

Dolamba Gram Panchayat गावातील नागरिक स्वतःच नालीतील घाण काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असून महिला दारातून हताशपणे पाहत आहेत. यावरून प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट होत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनही ग्रामपंचायत नाल्या सफाईकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. पावसाळा तोंडावर येऊनही नाल्या सफाई न करणे म्हणजे गावकèयांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur