Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिग्रस विधानसभा मतदारसंघात भाजपाच्याएसआयआर टोळी प्रमुखांच्या नियुक्त्या

दिग्रस विधानसभा मतदारसंघात भाजपाच्याएसआयआर टोळी प्रमुखांच्या नियुक्त्या

दिग्रस,

Deegres vidhansabha matadarsangh दिग्रस विधानसभा मतदारसंघातील दिग्रस दारव्हा नेर तालुक्यात शुक्रवार, 29 मे रोजी भाजपाकडून एसआयआर टोळीप्रमुखांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून एसआयआरच्या कार्याला चांगलीच गती प्राप्त झाली आहे.

प्रदेश भारतीय जनता पार्टीकडून मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण अर्थात एसआयआर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाकरिता एसआयआर टोळीप्रमुख म्हणून दिग्रस येथे ग्रामीणसाठी संजय घरत व केशव सावळगावकर, शहरासाठी सदानंद जाधव, दारव्हा ग्रामीण व शहर नरेंद्र जांभोळकर व नेर ग्रामीण मिनेश कटाळे तर शहरासाठी राजू निमकर यांची टोळीप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

Deegres vidhansabha matadarsangh एसआयआर दिग्रस विधानसभा प्रमुख अरुण राठोड व भाजपा पुसद जिल्हा महामंत्री प्रा. दत्तात्रय राहणे यांनी टोळीप्रमुखांना नियुक्तीपत्र दिले आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात ही एसआयआरची टोळी प्रमुखांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदार याद्यांचे शुद्धीकरणाच्या कामाला गती दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस विधानसभा मतदारसंघातील दिग्रस दारव्हा नेर तालुक्यात सर्वाधिक एसआयआरचे कार्य पूर्ण झाल्याची माहीती अरुण राठोड यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur