Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'डीजे नको' म्हणणाऱ्या बापटांना कॅमेऱ्यासमोरच झापड मारली

'डीजे नको' म्हणणाऱ्या बापटांना कॅमेऱ्यासमोरच झापड मारली

पुणे

Vidyanand bapat विद्यानंद बापट यांच्यावर एका तरुणाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर या प्रकरणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, एखाद्या व्यक्तीचे मत आपल्यापेक्षा वेगळे असेल तर त्याला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्यासाठी शारीरिक हिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे स्पष्ट केले.

वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आधी ऐकून घेणे आणि मत पटत नसेल तर त्याला वैचारिक पद्धतीने उत्तर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना असीम सरोदे यांनी पुण्याच्या सामाजिक प्रतिमेचाही उल्लेख केला. पुणे हे चांगुलपणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखले जाते; मात्र दुर्दैवाने काही प्रवृत्तींमुळे हेच शहर वाईटपणाचीही प्रयोगशाळा बनत असल्याचे चित्र दिसत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात काही कट्टरवादी प्रवृत्ती वाढत असून, विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला हा त्याच मानसिकतेचा परिणाम असल्याचे मत सरोदे यांनी व्यक्त केले.विद्यानंद बापट हे समाजात जनजागृतीचे काम करत असल्याचे सांगत सरोदे यांनी, एखाद्याचे विचार आपल्याला मान्य नसतील तर त्याला विरोध करण्यासाठी वैचारिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असे नमूद केले. "वेगळं मत मान्यच करायचं नाही" ही प्रवृत्ती धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विचार पटत नसल्यास त्याला वैचारिक उत्तर देणे हा लोकशाहीचा मार्ग आहे; परंतु व्यक्तीवर शारीरिक हल्ला करून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावेळी सरोदे यांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा दाखला दिला. समाजजागृतीचे काम करताना फुले दाम्पत्याला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या वाट्याला अपमान आणि त्रासही आला. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या काळात समाजातील प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडियावरील ट्रोलिंग, शिवीगाळ आणि आता प्रसंगी मारहाणीचाही सामना करावा लागत असल्याचे सरोदे यांनी नमूद केले.विद्यानंद बापट यांनी हाती घेतलेला ध्वनी प्रदूषणाचा मुद्दाही मोठा असल्याचे सरोदे यांनी सांगितले. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ध्वनी प्रदूषण कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सण आणि उत्सव साजरे करताना स्वतःच्या आनंदासोबतच इतर नागरिकांचाही विचार करणे आवश्यक असून, उत्सव संवेदनशील पद्धतीने साजरे केले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. उत्सवांदरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण, मोठ्या आवाजातील संगीत आणि त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम हा सातत्याने चर्चेचा विषय ठरत असतो. त्यामुळे नियमांचे पालन करून उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे सरोदे यांच्या प्रतिक्रियेतून अधोरेखित झाले.विद्यानंद बापट यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते सुखरूप असल्याचेही असीम सरोदे यांनी सांगितले. मात्र, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बापट यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सरोदे यांनी केली.मतस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य vidyanand bapat दडपण्यासाठी हिंसेचा वापर करण्याची मानसिकता ही समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे, असे सरोदे यांनी म्हटले. एखाद्या विचाराशी असहमती असल्यास संवाद साधणे आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे हाच योग्य मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीवर हल्ला करून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही मूल्यांसाठी गंभीर बाब असून, विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur