Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन दिवसाच्या पुराने शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून नेले f

दोन दिवसाच्या पुराने शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून नेले f

तळेगाव (शा. पंत)

Flood farmer आष्टी तालुक्यातील मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुराने शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फेरले आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने परिसरातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले.

त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

flood farmer दोन दिवसात आलेल्या पावसाने वडाळा, साहूर, बोरगाव, माणिकवाडा, तारासावंगा, अंतोरा, खंबीत, बेलोरा, भारसवाडा, खडकी, परसोडा, सिरसोली, चिस्तूर, भीष्णूर, आनंदवाडी, राणवाडी, तळेगाव, बंबरडा, बोरखेडी, थार, किन्ही, मोई, धाडी, पोरगव्हाण, पंचाळा, पिलापूर, लहान आर्वी, जैतापूर, लिंगापूर, जोळवाडी, देलवाडी आणि अंबिकापूर परिसरातील नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केल्याने शेकडो एकर शेतांमधील नव्याने पेरलेली पिके वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून आहे.

flood farmer २७ व २८ जूनच्या अतिवृष्टीतून शेतकरी सावरत नाही तोच १ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने उरली-सुरली आशाही हिरावून घेतली. सोयाबीन, कापूस, तूरसह विविध खरीप पिके पूर्णपणे खरडून गेली असून अनेक ठिकाणी सुपीक मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे हजारो शेतकर्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे.

कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून आणि उसनवारी करून बियाणे व खतांची खरेदी करणार्या शेतकर्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मेहनतीचे स्वप्न दोन दिवसाच्या पुराने वाहून नेले. आता पुन्हा पेरणी करण्यासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकर्यापुढे आहे.

flood farmer धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत, दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, खते व विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur