Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन ट्रकमधून गोवशांची अवैध वाहतूक

दोन ट्रकमधून गोवशांची अवैध वाहतूक

वाशीम

Illegal cattle transport येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍या दोन ट्रकला तोंडगाव टोल नाक्यावर अडवून दोन्ही ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर गोवंशाची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

illegal cattle transport मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून एमएच ४५ एसएफ ०१९९ व एमएच ०३ सीबी ००४३ या दोन ट्रकमध्ये अवैध पद्धतीने गोवंशाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नांदेड- अकोला महामार्गावर तोंडगाव टोलनाक्याजवळ ही दोन्ही वाहने अडवली. या दोन्ही वाहनांमध्ये जवळपास २५ गोवंश आढळुन आली. जनावरांची कोंबून वाहतूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

illegal cattle transport घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांसह जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी संबंधित चालक गजानन राऊत रा. मंगरुळनाथ व देवराव बर्गे रा. दापोरी ता. कळमनुरी जि. हिंगोली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur