Dailyhunt
'एक वोट की किमत तुम क्या जानो...'

'एक वोट की किमत तुम क्या जानो...'

चेन्नई

Tamil Nadu elections 'एक मत काय फरक पाडणार?' असं म्हणणाèयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना तामिळनाडूच्या निवडणुकीत घडली. विजयाच्या जवळ पोहोचलेला उमेदवार फक्त एका मताच्या फरकाने पडला तर दुसरा निवडून आला.

अशावेळी एक मतही किती महत्त्वाचं असतं याची जाणीव होते. ४ आणि ८ तासांच्या अंतरावर मतदान करायचं असतानाही कानाडोळा करणारे मतदार आहेत. मात्र चक्क एक व्यक्ती ३००० किमी अंतर पार करून परदेशातून मतदान करायला पोहोचला. त्याने आपलं मत दिलं आणि तिथला उमेदवारही जिंकवून दिला.

Tamil Nadu elections दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्या तमिळगा वेत्री कषगम अर्थातच टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवला. मात्र, या ऐतिहासिक विजयाची सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूर मतदारसंघात. जिथे एका मतदाराने ३ हजार किलोमीटरचा प्रवास करून येत असा काही गेम फिरवला की, सत्ताधारी पक्षाचा बडा उमेदवार पराभूत झाला.

Tamil Nadu elections कोण आहे हा गेम फिरवणारा मतदार?

ओमानमध्ये नोकरीला असलेला मणिकंदन शिवनाथम हा या विजयाचा खरा सूत्रधार ठरल्याची चर्चा आता देशभरात रंगली आहे. फक्त आपल्या आवडत्या नेत्याला आणि पक्षाला मत देण्यासाठी मणिकंदनने मस्कत ते तामिळनाडू असा विमान प्रवास केला. १६ एप्रिल रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपण फक्त मतदानासाठी घरी जात असल्याचं सांगितलं. निकाल लागला तेव्हा त्याच्या या एका मताने चमत्कार घडवल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.

केवळ एका मताने मंत्री गारद!

Tamil Nadu elections तिरुपत्तूर मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेतुपती आणि डीएमकेचे दिग्गज मंत्री के.आर. पेरियाकरुप्पन यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतमोजणीच्या शेवटी जे समोर आलं ते सर्वच अवाक झाले. फक्त एका मताने टीव्हीकेच्या उमेदवाराचा विजय झाला होता. मणिकंदनने दावा केला आहे की, त्याने ओमानवरून येऊन दिलेले ते एक मत जर नसतं, तर आज निकाल वेगळा असता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur