Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये

एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये

तभा वृत्तसेवा

बाभुळगाव,

Ashok-uike : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली.

त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच उपस्थित अधिकाèयांना एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.

मंत्री डॉ. उईके यांचे नांदुरा (बु) येथे आगमन झाले असता उपस्थित अशोक महानूर, डॉ. कृष्णा देवमुंडे, अविनाश जानकर, गुणवंत महानूर यांनी बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती खरडून गेली, विजेचे खांब पडले, शेतातील गोठे, स्प्रिंकलर सेट, पाईप, शेतीची अवजारे पाण्यासह वाहून गेली. या सर्व मनुष्यनिर्मित संकटाला बेंबळा प्रकल्प अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगून कारवाईची मागणी लावून धरली.

यानंतर विरखेड, वाटखेड, वाटखेड खुर्द, हस्तापूर व सावंगी मांग या गावांना भेटी देऊन शेतात जाऊन मंत्री डॉ. अशोक उईके यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांनी यावेळी पुरामुळे शेताकडे जाणारे रस्ते, पूल वाहून गेल्याचे सांगून मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्यासह उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार मीरा पागोरे, बेंबळा प्रकल्प कार्यकारी अभियंता मनोज डोके, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता प्रीती मस्के, तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे, ठाणेदार दीपमाला भेंडे, उपविभागीय अभियंता धनश्री रापतवार, पाणीपुरवठाचे निखिल मोटे, शाखा अभियंता काझी, डॉ. प्रशांत झाडे, डॉ. सुरेखा नामवाड, विस्तार अधिकारी हेडाऊ, लांजेकर उपस्थित होते.

भाजपा जिल्हा सचिव सतीश मानलवार, तालुकाध्यक्ष नितीन परडखे, आशिष सोळंके, अनिकेत पोहोकार, संजय राठी, अभय तातेड, विवेक परडखे, मयूर पिसे, सोनू शर्मा, चुडामण मदारे, गौतम लांडगे, महादेव गर्जे, सागर काळे, प्रवीण चेंडकापुरे, शुभम तिखे, डॉ. अजाब डाखरे उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur