Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एम. डी.ची तस्करी करणार्‍यांवर कारवाई

एम. डी.ची तस्करी करणार्‍यांवर कारवाई

वर्धा,

MD Trafficking स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने हिंगणघाट येथील माउली पार्क, संत तुकडोजी वार्ड येथे छापा टाकूण एमडी अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या चार जणांच्या टोळीला अटक केली.

त्यांच्याकडून एमडी, रोख, मोबाईल, दुचाकी असा ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली आहे. शनिवार ३० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे माऊली पार्क येथे येथे छापा टाकला. निखील रामनवार (२५) रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट, पीयूष मुसळे (२७) रा. गोमाजी वार्ड, जय चुटे (२१) रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, कार्तिक हमंद (२९) रा. संत तुकडोजी वार्ड हे मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता एम.डी. अंमली पदार्थ, रोख, मोबाईल, दुचाकी मिळून आली. पीयूष मुसळे वर्धा जिल्ह्यातून हद्दपार असताना त्याने नियमांचे उल्लंघन करून मिळून आला. अंमली पदार्थचा साठा हा चारही आरोपींचा असून त्यांनी ५ पंकज साठोणे रा. नागपूर यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी ४ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

MD Trafficking ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, सलाम कुरेशी, मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, हमीद शेख, रोशन निंबोळकर, महादेव सानप, रवी पुरोहित, सागर भोसले, विकास मुंडे, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राऊत, अभिषेक नाईक यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur