Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसटी बसची स्कूल बसला धडक

एसटी बसची स्कूल बसला धडक

वर्धा,

St bus collides with school bus रस्त्याच्या कडेला उभ्या स्कूल बसला मागून येणार्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघात स्कूल बसमधील तीन विद्याथ्र्यांसह पाच जण जखमी झाले. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी परिसरात २९ रोजी घडली.

देवळी येथील राहुल समर्थ (३२) हे नागठाणा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या एम. एच. ४० बी.एल. ३०४० क्रमांकाच्या स्कूल बसचे चालक आहे. ते २९ ऑगस्ट रोजी विद्याथ्र्यांना घेण्यासाठी नालवाडी येथे गेले होते.

नालवाडी ऑटो स्टँडजवळ त्यांनी स्कूल बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमध्ये अटेंडंट स्वाती घोडखांदे, मीनाक्षी देशमुख यांच्यासह विद्यार्थी होते. दरम्यान, नागपूरहून वध्र्याकडे येणार्या एम.एच. १४ एम.एच. ०८७८ क्रमांकाच्या बसने स्कूल बसला मागून धडक दिली. यात अंशूल आवळे, अंश आवळे, भाव्या शर्मा तसेच अटेंडंट स्वाती घोडखांदे आणि मीनाक्षी देशमुख जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती शाळा प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी स्कूल बस चालक राहुल समर्थ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी एसटी बस चालक निलेश बोंदरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur