Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गळ्यातून मंगळसूत्र काढणे ही पत्नीची क्रूरता

गळ्यातून मंगळसूत्र काढणे ही पत्नीची क्रूरता

चेन्नई

Mangalsutra divorce मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई पीठाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. एका हिंदू पत्नीने आपले मंगळसूत्र काढून टाकणे हा प्रकार पतीविरुद्ध मानसिक क्रूरता श्रेणीत मोडतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Mangalsutra divorce न्या. पी. वडमलई यांच्या खंडपीठाने वरील टिप्पणी करताना, 30 वर्षांपासून वेगळे राहणाèया जोडप्याला दिलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य ठरवला. पत्नीने घटस्फोटाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. या घटस्फोटाला कनिष्ठ न्यायालयाने परवानगी दिली होती.

Mangalsutra divorceमुळात, थाली हा दक्षिण भारतातील मंगळसूत्राचा एक प्रकार आहे. हे वैवाहिक जीवनातील एक पवित्र आभूषण मानले जाते. पतीने याचिकेत म्हटले होते की, पत्नी त्याच्यावर दुसèया महिलांशी संबंध असल्याचा आरोप करत होती. तिने लष्करात नवèयाच्या वरिष्ठ अधिकाèयांना तक्रारीची पत्रे देखील पाठवली होती. तिने आपली थाली (मंगळसूत्र) देखील काढून ठेवले होते. तिने दागिने घालणे बंद केले होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या सर्व कारणांमुळे मला घटस्फोट हवा असल्याचे पतीने म्हटले होते.

Mangalsutra divorce न्यायालयाने म्हटले की, हिंदू वैवाहिक जीवनामध्ये मंगळसूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. मंगळसूत्र हे वैवाहिक जीवन कायम सुखी राहावे यासाठी एक पवित्र प्रतीक आहे. मंगळसूत्र हे पतीच्या निधनानंतरच काढलं जातं. याचा आधार देत न्यायालयाने मंगळसूत्र हटवणे ही मानसिक क्रूरता दर्शवते, असे आदेशात लिहिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur