Thursday, 16 Sep, 8.02 pm तरुण भारत नागपूर

होम
घरातील हवा जास्त प्रदूषित!

मुंबई,

बाहेरच्या प्रदूषित हवेत जाण्यापेक्षा अनेकदा आपण घरात राहणे पसंत करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का बाहेरच्या हवेपेक्षा तुमच्या घरातील हवा जास्त प्रदूषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरातील वायुप्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 40 लाख मृत्यू होत असतात. गेल्या काही दिवसांत संशोधनातून असे लक्षात आले की, घर किंवा इतर इमारतींच्या आतील भागातील हवा ही बाहेरच्या हवेच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रदूषित असू शकते.

अमेरिकेत पर्यावरण संरक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार, बाहेरच्या तुलनेत घरातल्या प्रदूषणाचा स्तर दोन ते पाच पट, तर कधी 100 पटही जास्त असू शकतो. अनेक जण त्यांचा जवळपास 90 टक्के वेळ घरातच घालवतात. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

अनेकदा जेवण बनवल्यानंतर घरात धूर होतो, पावसाळ्यात ओलसरपणा भिंतीला आलेली बुरशी आणि त्याची दुर्गंधी, हे अंतर्गत वायुप्रदूषणाचेच प्रकार आहेत. व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्सद्वारे होणार्‍या प्रदूषणाचा पत्ता लावणे कठीण आहे. कारण ती कम्पाउंड्स म्हणजे असे वायू आहेत की, ज्यांना वास असतो किंवा नसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, घरातल्या वायुप्रदूषणामुळे सर्दी, तसेच श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणे जाणवू शकतात. नाक, डोळे, घशात जळजळ, वारंवार डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणेही या प्रदूषणामुळे दिसू शकतात.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur
Top