Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गिरड जंगल सफारी प्रकल्पात विविध कार्यक्रम

गिरड जंगल सफारी प्रकल्पात विविध कार्यक्रम

समुद्रपूर

World tiger day तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगाव ग्रापंचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी ढोणे म्हणाले की पर्यावरणाच्या दृष्टीने जंगल अबाधित राहणे काळाची गरज असून वाघांसह जंगलातील अन्य प्राणी सुद्धा जंगलात राहणे गरजेचे आहे.

नवघरे म्हटले की, आ. समिर कुणावार, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या विशेष परिश्रमामुळे गिरड येथे गावाला जंगल सफारी प्रकल्प मिळाला आहे. याठिकाणी असलेल्या वाघांचे या प्रकल्पात महत्त्वाचे योगदान आहे.कार्यक्रमाला गिरड येथील क्षेत्र सहाय्यक जी. पी. राऊत, वनरक्षक पि. डी. बेले, कल्याणी गोंडाने, कोंडबा गुंडापा, अमोल पिसे, संतोष पटले, आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur