Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोदामाचे छत कोसळल्याने कोलकात्यात खळबळ

गोदामाचे छत कोसळल्याने कोलकात्यात खळबळ

कोलकाता,

Warehouse roof collapses in Kolkata पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. ताराताला परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या एका गोदामाचे छत अचानक कोसळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम सुरू असताना लोखंडी संरचना अचानक कोसळली. त्यानंतर काँक्रीट आणि लोखंडी बीमचा मोठा ढिगारा कामगारांवर कोसळला. दुर्घटनेच्या वेळी अनेक कामगार आत काम करत असल्याने अडकलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत 13 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अजूनही 40 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अन्य बचाव यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. गॅस कटरच्या मदतीने लोखंडी संरचना कापून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याचे चित्र दिसत असून, मदतीसाठी आर्त हाकाही ऐकू येत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचे मंत्री डॉ. इंद्रनील खान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्याचा आढावा घेत आहेत. अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढणे हे सध्या प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासही सुरू करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur