Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोहत्या करणाार्‍यांवर 'मकोका' अंतर्गत कठोर कारवाई करा

गोहत्या करणाार्‍यांवर 'मकोका' अंतर्गत कठोर कारवाई करा

- सकल हिंदू समाजाची मागणी : जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

गोंदिया,

Cow Slaughter Case गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील भागातील तलावात गोवंश प्राण्याचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी 30 मे रोजी घडली होती.

या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी जवळच्या आंबाटोली (घोटी) येथील तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी व या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत याचा सखोल तपास करून कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तर तसे निवेदनही मंगळवारी 2 जून रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

Cow Slaughter Case सकल हिंदू समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस उप अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सादर निवदेनानुसार राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. असे असताना अत्यंत क्रुरपणे व जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून या घटनेमुळे लाखो हिंदूं धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. विशेष म्हणजे, 20 मे रोजी बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी गोहत्या होणार नाही व हिंदू धर्मियांच्या कोणत्याही भावना दुखावणार नाही असे अश्वासन दिले होते. त्यात काही दिवसांनीच गोवंश प्राण्याचे शिर धडा वेगळे करून तलावात फेकण्यात आल्याचे आढळून आले, हा प्रकार हिंदू धर्मियांना चिडवण्याचा असून सदर आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या ठिकाणी गोहत्या केली जात आहे ते घर उध्वस्त करण्यात यावे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करून घटनेमागील सुत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाजातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक रेखलाल टेंभरे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय बारेवार, महेंद्र रहांगडाले, सुभाष पटले, करण जैन, श्रीकांत बोपचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur