Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोल, संघर्ष अन् पेनल्टीचा थरार

गोल, संघर्ष अन् पेनल्टीचा थरार

नागपूर

Mayors-cup-nagpur रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या मेयर कप-२०२६ सेलिब्रिटी ओपन फुटबॉल स्पर्धेत पाचव्या दिवशी रंगतदार सामने झाले. दोन सामन्यांचा पेनल्टी शूटआउटमध्ये निकाल लागला.

पहिल्या सामन्यात वकीलपेठ बॉईज एफसीने अ‍ॅपेक्स एफसीचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर एफसीने महाकाल एफसीवर ४-३ अशी पेनल्टी शूटआउटमध्ये मात केली.

अन्य सामन्यांत गोल्डन स्टार एफसीने पार्वतीनगर एफसीचा ४-१, माजरी एफसीने बीएस एफसीचा २-०, तर कंद्री माइन्स एफसीने न्यू कादर एकता एफसीचा १-० असा पराभव केला. गोल्डन स्टारकडून मोहम्मद इकराम कुरेशी यांनी दोन गोल केले, तर माजरीच्या विजयात फैजान अन्सारी याने दोन गोल नोंदवले. कंद्री माइन्ससाठी विशाल राऊतेल यांचा ४७व्या मिनिटातील गोल निर्णायक ठरला.

मेयर कपचा पुढील थरार २५ सप्टेंबरला रेशीमबाग मैदानावर दुपारी १२ वाजल्यापासून रंगणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur