Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोरेगाव गोवंश अवशेष प्रकरणी तिघे ताब्यात

गोरेगाव गोवंश अवशेष प्रकरणी तिघे ताब्यात

- गोरेगाव पोलिसांची कारवाई : विहींप, बजरंग दलतर्फे कठोर कारवाईची मागणी

गोंदिया,

Goregaon Cattle Remains Case गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील तलावात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती.

या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तिव्र संताप व्यक्त करत आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रविवारी सकाळी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Goregaon Cattle Remains Case मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास काही नागरिक तहसील कार्यालयाच्या मागील भागातील तलावाकडे गेले असता त्यांना तलावाच्या पाण्यात मृत गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आले होते. ही वार्ता वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी सदर तलाव परिसरात एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे, अज्ञात व्यक्तींनी गोवंशाची हत्या करून तलावात अवशेष टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आजला असताना या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व तपासाला सुरुवात करण्यात आली. त्यात आज, रविवारी पोलिसांनी जवळच्या आंबाटोली (घोटी) येथील आरोपी तोशिफ हमीद अली सैय्यद (28), हनिफ रफीक शेख (45) व शाहिद इस्माईल शेख (29) सर्व रा. आंबाटोली या तिन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

विहींप,बजरंग दल आक्रामक...

पोलिसांनी आरोपींना आरोपींना अटक केली असली तरी सदर कृत्य धृणास्पद व कायद्याची पायमल्ली करणारे आहे. या कृत्यामुळे लाखो हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात असंतोष निर्माण झाला आहे. तेव्हा दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली असून अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर तसे निवेदनही पोलिस निरीक्षक गोरेगाव यांना देण्यात आले आहे.

या प्रकरणात तीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती गोरेगावचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur