Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोरेगाव येथील तलावात आढळले गोवंशाचे अवशेष

गोरेगाव येथील तलावात आढळले गोवंशाचे अवशेष

- परिसरात तनावाचे वातावरण : दोषींवर कठोर कारवाईची मागणी

गोरेगाव,

Goregaon Lake येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिक तहसील कार्यालयाच्या मागील भागातील तलावाकडे गेले असता त्यांना मृत गोवंश जनावरांचे अवशेष तलावात आढळून आले.

Goregaon Lake दरम्यान, अज्ञात व्यक्तींनी गोवंशाची हत्या करून तलावात अवशेष टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक रेखलाल टेंभरे यांनी घटनास्थळ गाठून या घटनेला पोलिसांनी गांभीर्याने घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टेंभरे यांनी सांगितले की, गोमाता ही हिंदू समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असून अशा प्रकारच्या घटना सामाजिक सलोखा बिघडविणार्‍या आहेत. त्यामुळे संबंधित दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur