Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हडस हायस्कूलमध्ये टिळकांना अभिवादन

हडस हायस्कूलमध्ये टिळकांना अभिवादन

नागपूर,

Hadas High School, Ramdaspeth लिबरल एज्युकेशन सोसायटी संचालित हडस प्रायमरी व हायस्कूल (इंग्रजी माध्यम-स्टेट बोर्ड), रामदासपेठ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी टिळकांना अभिवादन केले.

विद्यार्थी अवनिश राऊतमारे व वैष्णवी इटनकर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. संगीत शिक्षिका. अनुजा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी 'हे जीवन आपले सार्थ करा रे!' हे प्रेरणादायी गीत सादर केले. मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी टिळकांच्या स्वराज्य संकल्पनेवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दुर्विक इंगळे यांनी केले. कार्यक्रम शिक्षिका सुरभी संगमनेरकर व आरती बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur