हिंगणघाट,
Rescue of the lifeguard foundation शहरातील संत तुकडोजी वार्ड येथे हनुमान जयंतीच्या दिवशी एक वानर जखमी अवस्थेत आढळून आले. नागरिकांनी जीवरक्षक फाउंडेशनला तात्काळ माहिती दिली.
माहिती मिळताच जीवरक्षक फाउंडेशनची रेस्यू चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अत्यंत दक्षतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या जखमी वानराला रेस्यू केले.
भारतीय संस्कृतीत वानराला विशेष महत्त्व आहे. वानर म्हटलं की अनेकजण त्याला भगवान हनुमानजींचं एक रूप मानतात. कारण, रामायणात हनुमानजी हे वानररूपातच प्रभू श्रीरामांची सेवा करत होते. हनुमानजी हे शती, भती आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे वानर दिसलं की त्यातही त्या दिव्य शतीचं आणि नि:स्वार्थ सेवाभावाचं प्रतीक पाहिलं जातं. म्हणूनच अनेक ठिकाणी वानरांना त्रास न देता त्यांची काळजी घेतली जाते. अशा श्रद्धेमुळे जखमी वानराला वाचवणे म्हणजे हनुमानजींची सेवा केल्यासारखे मानले जाते, आणि हेच आपल्या संस्कृतीतील दयाभाव व प्राणीप्रेम दर्शवते.जीवरक्षक फाउंडेशनच्या चमूने पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या सहाय्याने वानरावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर वानराची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला पुढील देखभालीसाठी वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.rescue of the lifeguard foundation या संपूर्ण घटनेत जीवरक्षक फाउंडेशनच्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या सजगतेमुळे एका मुया जीवाला नवजीवन मिळाले. या कार्यासाठी वन्यजीवरक्षक राकेश झाडे, सर्पमित्र ओम चाफले, विराज कुंभारे, नयन वैद्य, भाविक कोपरकर, वन कर्मचारी योगेश पाटील यांनी सहकार्य केले.

