Dailyhunt
हाय हील्समध्ये अक्षय कुमारचा धमाल डान्स!

हाय हील्समध्ये अक्षय कुमारचा धमाल डान्स!

Akshay Kumar अक्षय कुमारच्या 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या गेम शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आणि या शेवटच्या भागात एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. शोमध्ये पाहुण्या म्हणून जॅकलिन फर्नांडिस, भूमी पेडणेकर आणि फराह खान उपस्थित होत्या.

गप्पा-गोष्टीदरम्यान जॅकलिनने अक्षयला 'लाल परी' गाण्यावर हाय हील्स घालून डान्स करण्याचे आव्हान दिले. सुरुवातीला अक्षय थोडा घाबरला आणि त्याने कधीच असे केले नाही असे सांगितले, पण शेवटी तो तयार झाला.

शोमध्ये जॅकलिन आणि भूमीने मजेत सांगितले की, अक्षय सेटवर अनेकदा प्रँक्स करतो. त्याचाच बदला म्हणून जॅकलिनने त्याला हील्स घालून एक मिनिट डान्स करण्याचा टास्क दिला. तिने अट ठेवली की, जर तो मध्येच थांबला तर त्याला 1 लाख रुपये द्यावे लागतील. या मजेशीर चॅलेंजमुळे वातावरण आणखी रंगले. फराह खानच्या प्रोत्साहनानंतर अक्षयने हिम्मत दाखवत हील्स घातल्या आणि डान्स सुरू केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur