ढाका,
बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी एका इमामासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. हि हिंसक घटना शुक्रवारी कदीम मजहाटी परिसरातील काली मंदिर येथे घडली.
या हल्ल्याचे नेतृत्व इमाम असलेल्या केले होते. अटक केलेल्यांमध्ये 22 वर्षीय ममूनूर रशीद, 15 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन, 50 वर्षीय ग्रामीण डॉक्टर काफील उद्दिन यांनी शनिवारी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मंदिराचे उपाध्यक्ष बीरेंद्र चंद्र बोरमोन यांनी शुक्रवारी रात्री सुमारे अज्ञात सुमारे 35 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस अधिकारी (ओसी) शमसुल आलम सिद्दीकी यांनी आयएएनएसला दिली आहे.
गेल्या तीन दिवसांत देशभरातील हिंदू मंदिरांवर हल्ल्यांसह हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान चार जण ठार झाले आणि 70० जण जखमी झाले. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल (BHBCUC) चे सरचिटणीस राणा दासगुप्ता यांच्या मते, कट्टरपंथी हल्लेखोरांनी 70 पेक्षा जास्त प्रार्थनास्थळे, 30 घरे, अल्पसंख्यांकांची 50 दुकाने फोडली, त्यांना जाळले आणि लूट केली. या हल्ल्यांमुळे सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल जवळपास शेकडो लोकांना अटक करण्यात आली. 24 जिल्ह्यांमध्ये बीजीबी जवान तैनात करण्यात आले आहेत, प्रार्थनास्थळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

