Dailyhunt
हुडकेश्वरमध्ये फास्ट फूड सेंटरला आग

हुडकेश्वरमध्ये फास्ट फूड सेंटरला आग

नागपूर ,

Fast food center हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील हुडकेश्वर रोड, म्हाळगी नगर परिसरातील डेलिया बाईट या फास्ट फूड सेंटरला बुधवार, दि. 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.आग लागली त्या वेळी फास्ट फूड सेंटर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र आगीत दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.Fast food center त्यांच्या तत्परतेमुळे आजूबाजूच्या दुकानांपर्यंत आग पसरू न देता मोठे नुकसान टळले.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास हुडकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.

सौजन्य:यामिनी ठेवले,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur