Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इंजेक्शननंतर अवघ्या पाच मिनिटांत तरुणाचा मृत्यू

इंजेक्शननंतर अवघ्या पाच मिनिटांत तरुणाचा मृत्यू

उत्तर प्रदेश

Fake doctorउत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात तापावर उपचार घेत असताना ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोलाछाप डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तरुणाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

ही घटना जसवंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव रत्नेश असे आहे. रत्नेश गेल्या काही काळापासून तापाने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबीयांनी नगला हिम्मत येथील एका स्थानिक व्यक्तीला घरी बोलावले होते. संबंधित व्यक्ती मेडिकल स्टोअर चालवण्यासोबतच घरीच लोकांवर उपचार करत असल्याचे सांगण्यात येते.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने रत्नेशला तापावरील उपचारासाठी इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच रत्नेशची प्रकृती बिघडली आणि सुमारे पाच मिनिटांतच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घाईघाईने अलीगंज येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रत्नेशला मृत घोषित केले.घटनेनंतर आरोपी असल्याचे सांगितले जात असलेला संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा मुख्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. जसवंतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुबोध कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि इंजेक्शनचा त्याच्याशी काही संबंध होता का, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील सिंभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माधापूर गावातही गंभीर घटना घडली आहे. मध्यरात्री घरात शांतपणे झोपलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर एका युवकाने ॲसिडने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्या असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur