Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणचा कुवेतवर ड्रोन हल्ला

इराणचा कुवेतवर ड्रोन हल्ला

कुवेत,

Irans drone attack on kuwait इराणच्या आक्रमकतेमुळे कुवेतने हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे़ देशाच्या हद्दीत घुसलेल्या एका शत्रू ड्रोनला रोखून नष्ट केल्याचा दावा कुवेतच्या लष्कराने केला आहे़ उत्तर कुवेतमधील एका सरकारी इमारतीवर आणि बुबियान बेटावरील एका कंपनीवर हा हल्ला झाला़ सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सांगण्यात येत आहे़ अमेरिका आणि इस्रायलकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या वृत्तांदरम्यान, इराणने एक कडक इशारा दिला आहे.

इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जर देशावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या प्रमुख आस्थापना आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या ऊर्जा आस्थापनांना लक्ष्य केले जाईल.

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण सतर्कइराणच्या वृत्तसंस्थेनुसार, एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने एक संपूर्ण प्रत्युत्तरात्मक रणनीती तयार केली आहे़ गरज पडल्यास ती तात्काळ अंमलात आणेल. इराणच्या लष्कराने ४० दिवसांच्या युद्धादरम्यान आणि त्यानंतरच्या लष्करी कारवायांमध्ये आपली क्षमता आणि सज्जता आधीच दाखवून दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संभाव्य नवीन हल्ल्यांच्या तयारीचे आदेश दिल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.इराण खाेटारडा, आता विश्वासच राहिला नाही : ट्रम्पअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबत अणुचर्चा सुरू आहे़ परंतु आता माझा त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. इराण चर्चेत सहभागी होतो़ परंतु आपली आश्वासने पूर्ण करत नाही, असा आराेपही त्यांनी केला. कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले, ते खोटे बोलतात आणि तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडतात. त्यांना नेहमी वाटाघाटी करायच्या असतात, पण ते वारंवार आपली आश्वासने मोडतात, असेही ते म्हणाले.आम्ही अमेरिकेविरूद्धचे युद्ध जिंकले: गालिबाफदरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मोठा दावा केला आहे. इराणने अमेरिका आणि इस्त्रायलविरूद्धचे युद्ध जिंकले आहे, असे ते म्हणाले. दीर्घकाळापासून सुरू असलेले युद्ध आम्ही जिंकले आहे. आता देशात स्थिरता स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने केशम बेटावरील सामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले करण्याचे पाप केले आहे. बुशेहर, फार्स आणि खुजेस्थान प्रांतातील नागरिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur