Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जैन सेवा मंडळच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जैन सेवा मंडळच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नागपूर,

Jain Seva Mandal संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका श्रुतमती माताजी आणि आर्यिका उपशममती माताजी यांचे २० मे २०२६ रोजी मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात निधन झाले.

या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातील जैन समाजात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच जैन संतांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन आणि निवेदन देण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील सकल जैन समाजातर्फे श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट, परवारपुरा येथून भव्य मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा बडकस चौक, महाल येथे पोहोचली. Jain Seva Mandal यावेळी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. आमदार दटके यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सकल जैन समाजाची प्रतिनिधी संस्था असलेल्या 'श्री जैन सेवा मंडळा'तर्फे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. Jain Seva Mandal पायी विहार करणाऱ्या जैन संत आणि साध्वींच्या सुरक्षेसाठी 'राष्ट्रीय संत सुरक्षा योजना' तयार करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. तसेच रीवा येथील अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. श्री जैन सेवा मंडळाचे सरचिटणीस डॉ. दीपक शेंडेकर यांनी याबाबत माहिती दिली. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुमत लल्ला, माजी अध्यक्ष महेंद्र कटारिया, दिलीप गांधी, सुरेश डायमंड, डॉ. चंद्रनाथ भागवतकर, नानाजी थेरे, महेंद्र सिंघवी, कमलेश जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur