Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वरुड,

Attempt-to-burn-ones-own-mother-alive : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहादा येथे दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईला मारहाण करून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

महिलेने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवून गंभीर जखमी आईला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आईच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

विशाल ज्ञानेश्वर मरस्कोल्हे (३५, रा.बहादा) असे आरोपीचे नाव आहे. तर शीला ज्ञानेश्वर मरस्कोल्हे (५५) असे जखमी आईचे नाव आहे. आरोपी मुलगा हा विवाहित असून व्यसनाधीन आहे. त्यामुळे त्याचे व त्याच्या पत्नीमध्ये सतत वादविवाद होत होते. या त्रासाला कंटाळून आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली आहे. शुक्रवारी ३१ जुलै रोजी सकाळी दहादरम्यान आरोपी मुलाने आईसोबत वाद घातला. तू घरात राहू नको, आताच निघून जा असा दम भरून लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच घरातील बाटलीतील पेट्रोल आईच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. मात्र, शेजाऱ्यांनी ऐनवेळी घटनास्थळी धाव घेत आग विझवून जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेत महिला ४० टक्के होरपळल्याचे कळते. पोलिसांनी जखमी महिलेच्या बयाणावरून आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली व न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपीचंद वाघमारे, एएसआय विनोद बाभूळकर, मिनेश खांडेकर करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur