Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जवानांनो, आग दुर्घटनांनंतर समुपदेशन करवून घ्या

जवानांनो, आग दुर्घटनांनंतर समुपदेशन करवून घ्या

तभा वृत्तसेवा

यवतमाळ,

Counseling-after-fire : आगीच्या दुर्घटनांमधून इतरांचे प्राण वाचवताना त्या घटनांमधील अनुभव फायर फायटर्सच्या मनावर प्रतिकूल परिणाम करतात. वारंवार अशा आणीबाणीच्या परिस्थितीशी झुंज दिल्यानंतर आग प्रतिबंधक कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपले समुपदेशन करवून घेणे गरजेचे आहे.

यामुळे मनाचे स्वास्थ जपल्या जाते, अशी माहिती शहरातील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तरुलता श्रीरामे यांनी दिली.

4 मे रोजी जगभरात इंटरनॅशनल 'फायरफायटर्स डे'च्या निमित्याने आग प्रतिबंधक कर्मचाèयांचे मनोस्वास्थ जपले जावे, यासाठी तरुलता श्रीरामे यांच्याकडून जनजागृती सुरू आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी सतत जीवघेण्या परिस्थितींना सामोरे जात असतात. आगीच्या दुर्घटना, अपघात, जीवितहानी यांसारख्या घटनांमुळे त्यांच्या मनावर तीव्र ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत ताणताणाव, चिंता, नकारात्मक आठवणींचे मनावर होणारे आघात व त्यातून 'पीटीएसडी'सारखे विकार होण्याची शक्यता वाढते.

अशा घटनांनंतर कर्मचाèयांमध्ये विनाकारण भीती, झोप न लागणे, वारंवार त्या घटनेची आठवण होणे, पाहिलेले दृश्य डोळ्यांसमोर येणे, चिडचिड वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. जर या समस्यांना जास्त वेळेपर्यंत मनात दडपून ठेवल्याने दीर्घकालीन मानसिक समस्या निर्माण होतात.

अशा प्रसंगांना सामोरे गेल्यानंतर आग प्रतिबंधक कर्मचाèयांनी आपल्या मानसिक आरोग्यासाठी वेळोवेळी समुपदेशन करवून घेतले पाहिजे. यासोबतच श्वसनाचे व्यायाम, सकस आहार, छंद आणि सहा ते आठ तासांची झोप होईल याची काळजी घ्यायला हवी, आपल्या सहकाèयांसोबत स्नेहपूर्ण संबंध आणि सहकार्याची भावना असावी.

विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे अतिशय गरजेचे आहे. काही घटनांचा जर मनावर खोलवर परिणाम झाल्यास या घटना त्यांना त्रास देतात. यामुळे त्यांचे कुटुंब, कामकाज आणि सामाजिक पातळीवर परिणाम होत असतील तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur