Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राज बनला पोलिस

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राज बनला पोलिस

दारव्हा,

हानपणीच वडिलांचे छत्र हरवूनदेखील खचून न जाता स्वतःच्या मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर Raj Chandrasekhar Praghan राज चंद्रशेखर प्रघाने याने महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवून प्रेरणादायी यश संपादन केले आहे.

त्याची नागपूर शहर पोलिस दलात निवड झाल्याने परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Raj Chandrasekhar Praghan राज हा मूळचा आर्णी तालुक्यातील चिकनी येथील रहिवासी आहे. तो इयत्ता सातवीत शिकत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आई आणि लहान भाऊ यश यांच्यासह त्याला दारव्हा तालुक्यातील गोरेगाव येथे आपला मामा भास्कर शंकर खरे व अंकुश शंकर खरे यांच्याकडे यावे लागले. त्याचे प्राथमिक शिक्षण गोरेगाव येथे झाले, तर पुढील शिक्षण दिग्रस येथील वस्तीगृहात पूर्ण झाले. पोलिस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजने दारव्हा येथे येऊन तयारी सुरू केली. सलग तीन वर्षे परिश्रम घेतल्यानंतर त्याची नागपूर शहर पोलिस दलात निवड झाली. आपल्या यशाचे श्रेय राजने आई, मामा-मामी, लहान भाऊ यांच्यासह मार्गदर्शक पवन कांबळे, रोशन कावळे आणि मनोज राठोड यांना दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur