कुरखेडा,
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली शाखा गेवर्धा यांच्याकडून संजय कराडे यांना 2 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गेवर्धा यांच्याकडून प्रधानमंत्री Jeevan Jyoti Bima Yojana जिवन ज्योती विमा योजना अंतर्गत आंधळी येथील वनिता संजय कराडे यांनी 436 रुपयांचा विमा उतरवीला होता.
Jeevan Jyoti Bima Yojana मात्र त्यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे पती संजय पांडुरंग कराडे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश बँकेचे शाखा व्यवस्थापक नाट यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बँक शाखेचे लिपीक गायकवाड, वाकूडकर, कापगते उपस्थित होते.

