Dailyhunt
जिल्ह्यात वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस

जिल्ह्यात वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस

वरूड/अमरावती

Amravati: Unseasonal rain अमरावती शहरासह जिल्ह्यतल्या विविध भागात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरूच आहे.

या पावसाचा फटका गहू, मका, संत्रा, मोसंबी आदी पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Amravati: Unseasonal rain वरूड तालुक्यात बुधवारी घोराड, आमनेर, देऊतवाडा, उदापूर, नायगाव या परिसरात वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हातुर्णा, वाडेगाव, गाडेगाव, राजुरा बाजार, उदापूर, लोणी, वरूड, वाठोडा आदि भागात वादळीवार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी काही भागात बोराच्या आकाराची गार झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तर शुक्रवारी झालेल्या वादळीवार्‍यामुळे कापणीसाठी आलेला गहू, मका जमिनीवर आडवा झाला तर संत्रा मोसंबीची फळे गळून पडली. शासनाने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. हातुर्णासह काही भागात वादळीवार्‍याने काहींच्या घरांवरील पत्रे उडाली. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस येत आहे. अमरावती शहरातही सलग तिन दिवसांपासून रात्री पाणी येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur