Dailyhunt
जिवंत महिलेला 'मृत' दाखवून भत्ता बंद; ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

जिवंत महिलेला 'मृत' दाखवून भत्ता बंद; ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

पुणे,

Women-allowance-stopped : पुणे जिल्ह्यातील नीरा परिसरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १०० टक्के अंध आणि दिव्यांग असलेल्या एका महिलेला कागदोपत्री 'मृत' दाखवून तिचा निर्वाह भत्ता बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ही घटना नीरा ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. संबंधित महिला प्रत्यक्षात जिवंत असतानाही नोंदीत मृत दाखवल्यामुळे तिला मिळणारी आर्थिक मदत थांबवण्यात आली. त्यामुळे तिच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur