Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कच्च्या तेलाचा भडका; दर १२० डॉलर पार

कच्च्या तेलाचा भडका; दर १२० डॉलर पार

वॉशिंग्टन,

Crude oil spill जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी उंची गाठली असून, प्रति बॅरल १२० डॉलरचा टप्पा पार केल्याने अर्थव्यवस्थांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षांतील ही उच्चांकी पातळी मानली जात असून, यामुळे महागाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरवाढीमागे अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या या मार्गावरील हालचालींवर परिणाम झाल्याने तेल पुरवठा खंडित झाला असून, जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा आणि मागणी यामधील समतोल ढासळल्यामुळे दरवाढीचा वेग वाढला आहे. अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा बाधित होण्याची शक्यता असून, त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारही सावध भूमिका घेताना दिसत आहेत.दरम्यान, अमेरिका इराणवरील दबाव वाढवत असून तेल वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य पूर्वेत वाढत चाललेली हालचाल या संकटाचे गांभीर्य अधोरेखित करत आहे. या सर्व घडामोडींचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होण्याची शक्यता आहे, कारण भारत आपल्या गरजांचा मोठा भाग परदेशातून आयात करतो. इंधनाचे दर वाढल्यास पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर आणि महागाईवर होऊ शकतो. त्याचबरोबर चलनावरही ताण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur