Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कांदा खरेदी दरात १३ टक्क्यांनी वाढ

कांदा खरेदी दरात १३ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली,

Onion procurement prices कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत १८७५ रुपये प्रतिक्विंटल हा कांद्याचा खरेदी दर होता, त्यात १३ टक्क्यांची वाढ करत, तो २१२५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.

कांद्याच्या दरात झालेली ही वाढ ४ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कांद्यांच्या चालू हंगामात करण्यात आलेली ही पाचवी दरवाढ आहे.

यावर्षी कांद्याची खरेदी सुरू झाली तेव्हा कांद्याचा खरेदी दर १२.७० रुपये प्रतिकिलो होता. २२ मे रोजी तो १५.८० रुपये झाला, १३ जून रोजी हा दर १६.५० रुपये करण्यात आला. २० जूनला हा दर १७.३० रुपये झाला, त्यानंतर १८.७५ रुपये प्रतिकिलो दराने कांद्यांची खरेदी सुरू होती, त्यात आता वाढ होत तो दर २१.२५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

मूल्य स्थिरीकरण कोषाच्या आधारे सरकारी पातळीवर कांद्यांची खरेदी अतिशय मंद गतीने सुरू आहे. २०२६ या वर्षीच्या बफर स्टॉकसाठी आतापर्यंत फक्त दोन हजार टन कांद्यांची खरेदी करण्यात आली. देशात कांद्यांची कोणतीही टंचाई नाही, २०२६ २७ या वर्षात देशात कांद्यांचे ३०७.३७ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे, मागील वर्षी कांद्याचे उत्पादन ३०७.६७ लाख टन झाले होते.

देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात ही कांद्यांची प्रमुख उत्पादक राज्ये आहे. या राज्यात कांद्यांचा पुरेसा साठा आहे. देशातील ठोक बाजारात रोज ५० हजार टन कांद्यांची आवक होत आहे. खुल्या बाजाराता कांद्याचा दर ३१ रुये प्रतिकिलो आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur