Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कापड व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक

कापड व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक

अनिल कांबळे

नागपूर,

Textile merchant defrauded गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका कापड व्यावसायिकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याच पद्धतीने आरोपीने इतरांचीही फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित सुरेश पुनयानी (४८, रा. ईस्ट वर्धमाननगर, लकडगंज) यांचे तीन नळ चौक येथे 'अल्फा अपॅरल्स' नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. जून २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राजल मोहित वेद (५३, रा. पन्नासे ले-आऊट, स्वावलंबीनगर) याची पुनयानी यांच्याशी व्यावसायिक व्यवहारातून ओळख झाली. या काळात आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा आर्थिक नफा मिळेल, असे सांगून पुनयानी यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून पुनयानी यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण १६ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले. मात्र, ठरलेली मुदत उलटल्यानंतरही आरोपीने ना गुंतवलेली रक्कम परत केली, ना कोणताही नफा दिला. पुनयानी यांनी वारंवार पैसे परत मागितले असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत राहिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपीने इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे गंडा घातला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur