Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
करिश्मा तन्नाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

करिश्मा तन्नाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

मुंबई

Karishma Tanna प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि तिचे पती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात आनंदाची नवी सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, २९ जुलै २०२६ रोजी करिश्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

या आनंदवार्तेमुळे त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून चाहते आणि सेलिब्रिटींकडून या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

करिश्मा आणि वरुण यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरत होता. तिच्या मातृत्वाच्या प्रवासावर चाहतेही सातत्याने लक्ष ठेवून होते.आता अखेर करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून, या नव्या पर्वामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur