Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोन वाहने जप्त

कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोन वाहने जप्त

वणी,

Vani news तालुक्यातील कायर परिसरातून गोवंशाची अवैध वाहतूक करणाèया दोन मालवाहू वाहनांवर शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी चार बैल व दोन वाहन असा 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

चारगावजवळ पोलिसांचे वाहन दिसताच भरधाव वेगाने निघालेल्या दोन्ही वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडविण्यात आले. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांत प्रत्येकी दोन याप्रमाणे चार बैल कोंबून बांधलेल्या अवस्थेत आढळले. या कारवाईत चार बैलांसह दोन मालवाहू वाहने असा एकूण 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

ईद-ए-मिलादच्या पृष्ठभूमीवर 25 ऑगस्ट रोजी पोलिस पथक कायर येथे पथसंचलन आटोपून शिरपूरकडे परतत होते. संध्याकाळी 7.30च्या सुमारास चारगावजवळ पोलिसांना एमएच29 सीएम1157 व एमएच29 सीएम0664 क्रमांकाची दोन मालवाहू वाहने भरधाव जाताना दिसली.

पोलिसांचे वाहन दिसताच चालकांनी वेग वाढविल्याने पोलिसांचा संशय बळावला. पाठलाग करून दोन्ही वाहने थांबवून त्यांची झडती घेतली असता प्रत्येक वाहनात दोन बैल याप्रमाणे चार बैल आढळून आले.

वाहनातील चौघांची चौकशी केली असता शनिदेवा शिवशंकर पांडे (25), बादल खुशाल नगराळे (22), रंजीत सुभाष कनाके (30) व साहील बंडू खोके (21) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.

चौकशीत चारही बैल वरोरा येथून खरेदी करून सलीम कुरेशी, रा. बेला, तेलंगणा याच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी बेला येथे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी सलीम कुरेशी याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पशुवैद्यकीय अधिकाèयांकडून चारही बैलांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना गुरु गणेश गो-रक्षण सेवाभावी संस्था, रासा, ता. वणी येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, इकबाल शेख, सूरज साबळे, प्रशांत झोड, सुनील दुबे व मंगेश सलाम यांनी पार पाडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur