Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केंद्रात राज्यमंत्री पद देतो म्हणून भाजपा समन्वयकाला गंडा

केंद्रात राज्यमंत्री पद देतो म्हणून भाजपा समन्वयकाला गंडा

तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळ,

Mahamandal niyuktya केंद्र सरकारच्या अंतर्गत 42 महामंडळांवर नियुक्ती केली जात आहे. या महामंडळावर जाण्यासाठी 20 कोटी 50 लाख रुपये मोजावे लागतील, अशी 'ऑफर' भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना देण्यात आली.

इतकेच नव्हे तर टोकन अमाऊंट म्हणून पाच टक्के रक्कम असलेली बॅगही ताब्यात घेतली. या प्रकरणात भुतडा यांच्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mahamandal niyuktya गेला शुक्रवार, 22 मे रोजी गणेश राठोड याने भुतडांसोबत व्यवहाराची बोलणी केली. 23 मे रोजी विश्वजित राठोड हा भाजपा कार्यालयात भुतडा यांना भेटला. त्यानंतर विश्वजित व लौकिक फुलकर हे माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयातही भेटीसाठी आले. भुतडा यांना या संपूर्ण व्यवहारावर संशय आल्याने त्यांनी स्पाय कॅमेरा लावून ठेवला. तसेच टोकन देण्यासाठी बॅगमध्ये रद्दी भरून वर 50 हजार रुपयांच्या 500 च्या नोटा ठेवल्या. जेणेकरून ठगबाजांना 5 टक्के म्हणजे 1 कोटी वाटतील. ठरल्याप्रमाणे गणेश राठोड व विश्वजित राठोड हे संपर्क कार्यालयात पोहोचले. त्यांनी टोकनची बॅग ताब्यात घेतली व तेथून निघून गेले.

मेसेजद्वारे साधला संपर्कलौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड व गणेश लालसिंग राठोड या सर्व यवतमाळकर ऑफर देणाèया ठगबाजांची नावे आहेत. लौकिक याने 16 मे रोजी नितीन भुतडा यांना मेसेजद्वारे संपर्क साधला असून त्यांना केंद्र सरकार अंतर्गत 42 महामंडळांची यादी पाठविली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur