Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूरमध्ये एकनाथ शिंदेंचे महाशक्तीप्रदर्शन

लातूरमध्ये एकनाथ शिंदेंचे महाशक्तीप्रदर्शन

लातूर

Eknath Shinde आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठवाड्याच्या राजकारणाला अत्यंत मोठी आणि अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित शिवसेनेच्या एका विराट मेळाव्यात एकाच वेळी तब्बल 25,000 कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा धरला.

माजी आमदार विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमालीची वाढली असून, स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

हा जनसागर भाडोत्री नाही'

Eknath Shinde या भव्य महासोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार प्रहार केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीमुळे हा सोहळा 1 दिवस पुढे ढलावा लागला होता, अशी माहिती देत शिंदेंनी सभेतील अलोट गर्दीवरून विरोधकांना सुनावले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'हा आजवरचा सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा ठरला आहे. इथली अथांग गर्दी पैसे देऊन किंवा गाड्या पाठवून गोळा केलेली नाही, तर ती विनायकरावांवरील प्रेमापोटी स्वतःहून आली आहे. ज्या विरोधकांच्या डोळ्यात राजकीय कावीळ झाली आहे, त्यांनी अहमदपूरला येऊन हा जनसागर डोळे उघडून बघावा. जनतेचे हे प्रेम कधीच विकत घेता येत नाही.'

प्रमुख नेते आणि शासकीय उपस्थिती

Eknath Shinde या भव्य राजकीय सोहळ्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह सुमारे 25,000 कार्यकर्ते आणि समर्थकांनी अधिकृत प्रवेश केला. या मेळाव्याला शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि आनंद परांजपे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. याशिवाय, शासकीय पातळीवरून जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील आणि आमदार मंगेश कुडाळकर यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur