Dailyhunt
'महागाई भत्त्यात वाढ... लाखो कर्मचाऱ्यांना फायदा'

'महागाई भत्त्यात वाढ... लाखो कर्मचाऱ्यांना फायदा'

नवी दिल्ली,

Dearness Allowance hike देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्के वाढीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे, डीए आता 58 टक्क्यांवरुन 60 टक्के झाला आहे.

या निर्णयानुसार, ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

या निर्णयाचा देशभरातील लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल. केंद्र सरकारच्या या घोषणेचा फायदा सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी, तसेच 69 लाख निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना होईल. यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि महागाईच्या काळात त्यांना आर्थिक दिलासा मिळेल. डीए वाढीमुळे कर्मचाèयांचे मासिक वेतन आणि निवृत्तीवेतन थेट वाढेल. ही वाढ 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाèया सर्व कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना लागू होईल.

महागाईचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न

महागाई भत्त्याचा (डीए) मुख्य उद्देश कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या उत्पन्नाचे महागाईच्या परिणामांपासून संरक्षण करणे हा आहे. तो मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार निश्चित केला जातो आणि वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. डीएची गणना औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय-आयडब्ल्यू) आधारित असते, जो कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कामगार ब्युरोद्वारे दरमहा प्रसिद्ध केला जातो.

दिवाळीत झाली होती तीन टक्के वाढ

गतवर्षी, केंद्र सरकारने Dearness Allowance hike दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाèयांसाठीचा महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीची महागाई सवलत तीन टक्क्यांनी वाढवली होती. त्यावेळी (ऑक्टोबरमध्ये), 1 जुलै 2025 पासून लागू होणारा डीए 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. त्या वाढीची थकबाकी देखील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देण्यात आली होती. ज्यामुळे त्यांना अतिरिक्त लाभ मिळाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur