Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मल्टीस्टारर कलाकारांची फौज ठरणार आकर्षण

मल्टीस्टारर कलाकारांची फौज ठरणार आकर्षण

मुंबई

Mamachya Govyala Jauya दमदार कथा, विनोद, अॅक्शन, सस्पेन्स आणि मैत्रीचा रंगतदार संगम अनुभवायला मिळणार असलेला 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा बहुचर्चित मराठी चित्रपट 31 जुलैपासून चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार एकाच पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात अंकुश चौधरी 'मामा'च्या भन्नाट भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांची धमाल चौकडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधील या चौघांची अफलातून केमिस्ट्री आणि अचूक विनोदी टायमिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रमुख कलाकारांसह नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, प्रवीण तरडे, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे आणि अवधूत गुप्ते हे दिग्गज कलाकार विशेष भूमिकांमधून चित्रपटात झळकणार आहेत. मात्र, त्यांच्या भूमिका नेमक्या काय असतील, याबाबतचे रहस्य चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनी यावेळी अभिनयाचीही जबाबदारी स्वीकारली आहे. पडद्यामागे कथा उभी करणारे विजू माने यांचा पडद्यावरील अभिनय हा चित्रपटातील आणखी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.'विजुमेनिया प्रा. लि.' आणि 'लाईट अँड शेड' प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून, पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर उलगडणारी ही मनोरंजनाने भरलेली कथा आणि दमदार कलाकारांची फौज यामुळे 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा मल्टीस्टारर चित्रपट 31 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याच्या प्रदर्शनाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur