Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मानकापुरात मजुराची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

मानकापुरात मजुराची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

- संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अनिल कांबळे

नागपूर,

Labourer murdered in Mankapur घराच्या बाहेर झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करुन खून केला. ही थरारक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मोहताबसिंह सोहनलाल चौधरी (४३, एलआयसी कॉलनी, गोधनी रेल्वे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहताबसिंह हे पत्नी गिता यांच्यासह मानकापुरातील जमील सोसायटीत किरायाने राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. ते बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होते. शुक्रवारी पती-पत्नीने जेवण केल्यानंतर काही वेळ गप्पा केल्या. त्यानंतर मोहताबसिंह हे घराच्या बाहेर असलेल्या उघड्या खोलीत झोपले तर गिता या घरात झोपल्या. पहाटे दोन वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने मोहताबसिंहवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या आवाजामुळे पत्नीला जाग आली. त्या धावत बाहेर आल्या. पतीला रक्ताच्या थोरळ्यात बघताच त्यांनी आरडाओरड केली. यादरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. शेजाऱ्यांनी धाव घेतली. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी अज्ञातआरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur