Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मराठा वधू-वर मेळावा ३१ मे रोजी नागपुरात

मराठा वधू-वर मेळावा ३१ मे रोजी नागपुरात

नागपूर,

Maratha Bride and Groom Meet अखिल भारतीय मराठा महासंघ, नागपूर विभागातर्फे मराठा समाजातील लग्नाळू मुला-मुलींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. ३१ मे रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.

हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सक्करदरा चौक, नागपूर येथे पार पडणार आहे. समाजातील विवाह जुळवणीच्या कार्यात दीर्घकाळ योगदान देणारे स्व. शरदराव भोसले आणि स्व. सतीशजी गिरमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे अध्यक्ष तथा भोसले राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले राहणार आहेत. तसेच उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते होणार आहे. Maratha Bride and Groom Meet यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विरान डेव्हलपर्सचे संचालक तथा मविप्र समाजाचे माजी कार्याध्यक्ष दिलीपराव चव्हाण आणि नवनिर्वाचित नगरसेवक सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात मराठा महासंघाच्या नागपूर विभागाकडे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कमी किमतीतील वधू-वर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच मंचावर येऊन स्वतःचा परिचय धाडसाने सादर करणाऱ्या लग्नाळू युवक-युवतींना 'शौर्य पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. Maratha Bride and Groom Meet हा परिचय मेळावा पूर्णतः निःशुल्क असून मराठा समाजातील पालक, युवक-युवती तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा महासंघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व मुख्य संयोजक नरेंद्र मोहिते यांनी केले आहे.

सौजन्यल देवराव प्रधान, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur