Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मेळघाटात १५ दिवसांच्या बाळाच्या पोटावर १२ चटके

मेळघाटात १५ दिवसांच्या बाळाच्या पोटावर १२ चटके

चुरणी,

Burns-on-the-babys-stomach : मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेहट्याखेडा येथे एका १५ दिवसांच्या बालिकेवर अघोरी उपचार केल्याची घटना समोर आली पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील ६५ वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने तिच्या पोटावर तप्त विळ्याचे ११ ते १२ चटके दिले मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचारपद्धतीला डम्मा असे म्हटले जाते पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते आरोपी महिलेने चुलीवर विळा तापवून बालिकेला चटके दिले.

या अमानुष प्रकारामुळे चिमुकलीला तीव्र वेदना झाल्याने तिला तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले चिखलदराचे ठाणेदार प्रवीणकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली याबाबत मुलीच्या आईनेच तक्रार दिली

मेळघाटातील काही भागांत लहान मुलांचे पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित आजारांवर 'डम्मा देण्याची अघोरी उपचारपद्धती आजही प्रचलित आहे प्रत्यक्षात या प्रकारामुळे नवजात आणि लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात गेल्या दोन वर्षांत मेळघाटात अशा प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्याने मेळघाटात जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. रेहट्याखेळा प्रकरणांमध्ये आरोपी विरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार प्रवीण पाटील यांनी बोलताना सांगितले.

आशा सेविका गृहभेटी देत असताना सदर प्रकार तिच्या लक्षात आला.तिने प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालया अचलपूर येथे बाळाला उपचारासाठी पाठविले. उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती स्थिर आहे. चिखलदरा पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिस चौकशी करत आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रविण पारिसे अमरावती यांनी बोलताना सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur