Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोर्शी तालुक्यात दोन रेल्वे भुयारी मार्ग मंजूर

मोर्शी तालुक्यात दोन रेल्वे भुयारी मार्ग मंजूर

अमरावती

Dr-anil-bonde रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मोर्शी तालुक्यातील कोळविहीर-विष्णोरा पांदण रस्ता तसेच कोळविहीर - बहिरमपूर पांदण रस्ता या दोन ठिकाणी महत्त्वपूर्ण रेल्वे भुयारी मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.

चांदूर बाजार ते नरखेड रेल्वे मार्गामधील कोळविहीर-निंभोरा येथे रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी कमी उंचीचे सब-वे बांधण्यात येणार आहे. याच सेक्शनमधील कोळविहीर-बहिरमपूर येथेही रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी कमी उंचीचे सब-वे बांधण्याचे काम प्रस्तावित असून, दोन्ही कामे नागपूर विभागांतर्गत आहेत.

या दोन्ही अंडरपासमुळे संबंधित भागातील नागरिकांची रेल्वे रूळ ओलांडताना होणारी गैरसोय कमी होऊन प्रवाशांची व नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अमरावती व परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या शिफारसी व पाठपुराव्यामुळे या दोन महत्त्वपूर्ण कामांना गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 'नागरिकांची सुरक्षितता आणि रेल्वे वाहतुकीची सुविधा हीच प्राथमिकता असून, अमरावती व विदर्भातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाईल' असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur